राज्यात लॉकडाऊन होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही – दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणे

बारामती – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी सवांद साधत नियम पाळण्याचे आव्हान केले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’, अशी माहिती राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ‘लॉकडाऊन होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे. कोरोनाचे संकट संपले नाही. कोरोना अद्याप गेलेला नाही. शासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता आहे’, असे भरणे म्हणाले.

लॉकडाऊनच्या नावाखाली विनाकारण काहीजण साठेबाजी करण्याची शक्यता आहे. इंदापूर भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, डाळिंब या फळांचे पिक घेतले जाते. लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी सध्या आपल्या मालाचा भाव जितका आहे, त्यापेक्षा कमी भावाने विक्री करतात. राज्यात लॉकडाऊन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही’, असेही भरणे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –