‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाहीच; मात्र निर्बंध अधिक कडक होणार!

पुणे – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यात देखील रोज नव्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा अव्वल क्रमांक आहे. त्यामुळे इतर काही जिल्ह्यांप्रमाणे पुण्यातही लॉकडाऊन होणार का ? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

तर, स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यावसायिक यांनी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याला तीव्र विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागील बैठकीमध्ये देखील लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. यासोबतच, पुणेकरांना २ एप्रिल पर्यंतचा अल्टिमेटम देत जर नियमांचे पालन झाले नाही तर कडक निर्बंधांचे पाऊल उचलावे लागेल अशी तंबीच अजित पवार यांनी दिली होती.

दरम्यान, सर्व पुणेकरांचे लक्ष्य हे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे असताना आता मोठी माहिती समोर येत आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनचा प्रस्ताव दिला जाणार नाही. मात्र, गंभीर परिस्थिती लक्षात घेता आणखी कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे,’ अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील हजर असतील. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये कोणते कडक निर्बंध लागू केले जाणार याकडे सर्व पुणेकरांचा लक्ष्य असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –