आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्याच बरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान आज सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता.

मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यावेळी त्यांनी जे पात्र आहेत अशा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सध्या त्यात अनेक ठिकाणी लसींअभावी लसीकरण थांबल्याच्या घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या –