‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का नाही याबाबत आज निर्णय?

संचारबंदी

जालना – राज्यासह जिल्ह्यात ही कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लावावा का असा प्रश्न सध्या यंत्रणेला पडला आहे. त्यामुळे प्रशासनासह पालकमंत्री सुद्धा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन लावायचे की निर्बंध आणखी कडक करायचे याबाबतचा निर्णय पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

जालना जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरासह जिल्हाभरात लॉकडाऊनबाबत अफवांचे पेव फुटले आहे. होळी, धुलीवंदनाचा सण आल्याने लॉकडाऊन लागण्याच्या चर्चेमुळे प्रशासनही बुचकाळ्यात पडले. इकडे लोकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवित बाजारात किराणा व इतर साहित्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. अजून तरी लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेतला गेला नाहीये. पण, उद्या शनिवारी पालकंमत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

नागरिकांनी मास्क, सॅनिटायजरचा प्रभावीपणे वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी, धुलीवंदनाचा सण साजरा करत असताना प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी. होळीच्या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करु नये. कोरोनापासुन स्वत: सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कोरोनासंदर्भात प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचना तसेच निर्बधांचे तंतोतंत पालन करावे.

महत्वाच्या बातम्या –