कोरोनाचा कहर वाढत आहेत म्हणून ‘या’ जिल्ह्यातील व्यापार्‍यांचा लॉकडाऊनला विरोध मात्र संचारबंदीला सहमती

संचारबंदी

परभणी – परभणीमध्ये कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लॉकडाऊनला व्यापार्‍यांचा विरोध आहे, मात्र संचारबंदीला  सहमती आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्ह्यांप्रमाणे लॉकडाऊन संदर्भात सुरू केलेल्या हालचालींना व्यापार्‍यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध केला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्ह्यांप्रमाणे लॉकडाऊन संदर्भात सुरू केलेल्या हालचालींना व्यापार्‍यांसह उद्योजकांनी तीव्र विरोध केला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्‍यांसह उद्योजकांची व्यापक बैठक झाली. त्यातून कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव,  लॉकडाऊन संदर्भात गांभीर्याने विचारविनिमय केला. विशेषतः जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्याकरिता काही उपाययोजना म्हणून कठोरपणे लॉकडाऊन करावे लागेल, असे या वेळी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यासाठी किमान सात दिवसांचा लॉकडाऊन असावा, असा प्रशासनाव्दारे विचारविनिमय सुरू असल्याचेही सांगितले. या अनुषंगाने आपले मत काय आहे, अशीही विचारणा केली. तेव्हा बहुतांशी व्यापार्‍यांनी अन्य जिल्ह्यांप्रमाणे पूर्णतः लॉकडाऊन करण्यास तीव्र विरोध दर्शवला. वर्षभरापासून संपूर्ण व्यवहार पूर्णतः विस्कळीत झालेत.  छोटे – मोठे उद्योजक अभूतपूर्व अडचणीत आहेत. व्यवहार मंदावले आहेत. उलाढाल ढप्प आहे. कसेतरी व्यवहार सुरळीत होऊ लागले असतानाच पुन्हा लॉकडाऊन करत त्यावर गंडांतर आणू नये, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. उद्योजकांनीही या पध्दतीनेच सूर व्यक्त केला.

त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी काही उपाययोजना निश्चितच कराव्या लागतील. यातून मार्ग म्हणून दिवसाच्या ऐवजी रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावाच लागेल, असेही सांगितले. त्यावेळी व्यापार्‍यांनी त्यास सहमती दर्शवली. रात्री सात ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी लागू करावयास हरकत नसल्याचाही सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत व्यापार्‍यांनी आपापले व्यवहार करावेत, रात्री सातपासून सकाळी सातपर्यंत किमान सात दिवस संचारबंदी लागू करता येईल का याबाबत विचार करू, असे स्पष्ट केले. काही व्यापार्‍यांनी यातून जीवनावश्यक वस्तूंना पूर्णतः सूट द्यावी, अशी या वेळी मागणी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –