Share

सुंदर ओठ ठेवण्यासाठी वापरून पाहा ‘हे’ उपाय

Published On: 

🕒 1 min read

हिवाळ्यात काही लोकांचे ओठ सतत फाटतात. अधिक प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरल्यानेही ओठांचे सौंदर्य नष्ट होते. ओठ सुंदर आणि नरम राहण्यासाठी पुढे दिलेले घरगुती उपाय करून पाहा…

– विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील.

– ओठांचे पापुद्रे निघत असतील, ओठांना चीर पडत असेल तर रात्री ओठांना बदाम तेल लावा.

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी !

– रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा.

– ओठ फाटण्यावर रामबाण उपाय म्हणजे मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासांत परिणाम दिसतील.

– दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळूहळू गुलाबी होतात.

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी

– प्रत्येक ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी देशी गुलाबाच्या पाण्यात भिजवलेल्या काही पाकळ्या ओठांवर रगडा. या उपायाने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. यामुळे लिपस्टिक लावण्याची गरज भासणार नाही.

 

 

बातम्या (Main News) आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या