अवकाळी पावसाने ‘या’ जिल्ह्यात १८ हजार हेक्टरला फटका

बीड – गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून गेला आहे. पावसाने रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. तब्बल आठ हजार हेक्टरवरील गहू आणि दहा हेक्टरवरील ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे कृषी खात्याने व्यक्त केलाय.

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यालाही शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वारे आणि जोरदार पावसासह काही भागात गारपिटाने झोडपले. अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपीट आणि पावसामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांनाही तडाखा बसला आहे. विविध महसूल मंडळातून नुकसानीचा अंदाज व्यक्त होत आहे. अंदाजे बीड जिल्ह्यातील आठ हजार हेक्टरवरील गहू, दहा हजार हेक्टरवरील ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे या भागातील उभे पीक आडवे झाले आहे. फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यंदा बहरलेला आंब्याचा मोहर उद्धवस्त झाला आहे. या नुकसानीने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल व कृषी विभागास झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –