दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत, ते दर देशद्रोही आहेत – सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत

सांगली – कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.

जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या घटनेवर भाष्य करताना माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांवर टीकास्त्र डागले आहे. ‘दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते दर देशद्रोही आहेत’, असा हल्लाबोल खोत यांनी केला आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचे म्हणत झालेल्या हिस्र उद्रेकाचा तीव्र निषेध केला आहे. तर आंदोलक समर्थकांनी आंदोलन चिघळण्यामागे शेतकरी नसून इतर शक्तींचा यामागे हात असल्याचा दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –