शेतपीकांचे चिमण्या, पाखरे व रानडुकरे यापासुन राखण करण्यासाठी शेतात केला चक्क लाऊडस्पीकरचा वापर

लातूर – शेतकरी वर्षभर मेहनत करुन शेतमाल पिकवतो मात्र कधी कधी एका रात्रीत होत्याचे नव्हते होऊन शेतमालाचे नुकसान होते. परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनतो. मात्र शेतमालाच्या रक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उपाययोजना केल्या जात आहे. यातच एक नवीन भर पडली आहे.

आजच्या घडीला मशागतीपासून ते पेरणी, फवारणी ही कामे यंत्राचा वापर करुन केली जातात. मात्र आता यामध्ये आणखी भर पडली आहे, शेतपीकांचे चिमण्या, पाखरे व रानडुकरे यापासुन राखण करण्यासाठी शेतात चक्क लाऊडस्पीकरचा वापर केला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम तर कमी झाले आहेत. शिवाय, लाऊडस्पीकर लावले की, दिवसभर रेडीमेड आवाज शिवार दणाणून सोडतो. महत्वाचे म्हणजे यामुळे माणसाविना ज्वारीची चिमण्या, पाखरांपासून राखण होत आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यात यंदा २ हजार ३६२ हेक्टर्सवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्वारीची चिमण्या, पाखरांपासून राखण करण्यासाठी दोन दोन माणसे लावावी लागतात पण लाऊडस्पीकरचा वापर केला तर एका माणसाची सुध्दा गरज नाही. परिणामी, चार पाचशे रुपयांत मिळणाऱ्या लाऊडस्पीकरचा सर्व शेतकरी वापर करीत आहेत. याची किंमतसुध्दा माफक असून, या स्पीकर तासभर चार्जिंगवर दिवसभर वापरता येतो. ज्वारीची राखण करण्यासाठी लाऊडस्पीकरचा अत्यंत प्रभावी उपयोग होत असल्याचे मेजर दिलीप बिरादार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –