शेतकऱ्यांची अडचण आम्ही जाणून आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकावा – जिल्हाधिकारी

औरंगाबाद – शेतकऱ्यांची अडचण आम्ही जाणून आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकावा आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. परंतु तूर्तास तरी जाधववाडी भाजी मार्केट सुरु करता येणार नाही, लवकरच आम्ही पर्यायी व्यवस्था करणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली.

दोन दिवसापूर्वी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ‘१५ दिवस भाजीपाला खाल्ला नाहीतर कोणी मरणार नाही’ असे वक्तव्य एका माध्यमाशी बोलताना केले होते. त्यामुळे त्यांचावर टीकेची झोड उठली होती. शेतकरी व्यापाऱ्यासह सामान्य नागरीकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. त्यामुळे नागरिक न खाता राहू शकतात परंतु शेतकरी मात्र पिकवलेला माल न विकता मरेल अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत होत्या.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही समजू शकतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मोकळ्या मैदानावर किवा रत्याच्या कडेला बसून विकू शकतात असे सांगितले आहे. या शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करत आपला माल विकावा, किवा मंडीच्या बाहेर व्यापाऱ्याला दिला तरी हरकत नाही. असे जिल्हाधिकारी यानी सांगितले. यावेळी चिकलठान परिसरात शेतकरी रत्यावर बसून आपला माल विकत आहे. आम्ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –