राज्यातील महाविद्यालये कधी सुरु होणार? याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती

उदय सामंत

मुंबई – २०२० पासून कोरोना रोगाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. या रोगाचा दत्तक सर्व क्षेत्रांना बसला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट झाली आहे. तर शिक्षण क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे. नुकतेच १० वी आणि १२ वीच्या बोर्डाचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशप्रक्रिया देखील लवकरच सुरु होणार आहेत. दरम्यान, आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट देखील आटोक्यात आली असल्याने निर्बंध हटवले जात असून जनजीवन सुरळीत होत आहे.

२०२० पासून महाविद्यालय आणि शाळांच्या परीक्षा या प्रत्यक्ष होत नाहीयेत. मधल्या काळात टप्प्याटप्प्याने ५ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वच वर्ग पुन्हा ऑनलाईन होऊ लागले. तर उच्च शिक्षणाचे महाविद्यालये  २०२० च्या मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष बंदच आहेत. आता महाविद्यालये सुरु करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

‘येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर त्यासंबंधीची माहिती दिली जाईल,’ असं उदय सामंत म्हणाले आहेत.

काल कुलगुरू यांची बैठक झाली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी याबद्दल आढावा घ्यावा, अशा सूचना देखील सामंत यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –