‘हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचं कि विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प म्हणायचं’ – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज (दि. 8 मार्च) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. कोरोना काळात राज्याच्या महसुलात मोठी घट झाली असून आपत्कालीन स्थितीतून सावरण्यासाठी राज्याचा खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतील वित्तीय तूट ही साहजिकच वाढली आहे.

दरम्यान, बजेट पूर्णपणे सादर झालं असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचं कि विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प म्हणायचं असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे. या अर्थसंकल्पाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण निराशा झाली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याचा शब्द सरकारने दिला होता. मात्र त्या संदर्भात एकाही पैशाची तरतूद केलेली नाही,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

वादग्रस्त गोसीखुर्द प्रकल्पासाठी तब्बल १ हजार कोटींची तरतूद !

वादग्रस्त गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी १,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या कामासाठी २६ प्रकल्पाची कामी आहेत. त्यापैकी १३ प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी १५,३३५ कोटी ६५ लाख इतका खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –