आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

अजित पवार

मुंबई – आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा ९,५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी १,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या कामासाठी २६ प्रकल्पाची कामी आहेत. त्यापैकी १३ प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी १५,३३५ कोटी ६५ लाख इतका खर्च प्रस्तावित आहे. असे मत या वेळी पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.

विदर्भातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील गोसी खुर्द प्रकल्पाला आता पूर्णत्वास नेण्यासाठी १८ हजार कोटींची गरज आहे. सुरुवातीला ३७४ कोटी रुपयांच्या भूमिपूजनपासून सुरुवात झालेला हा प्रकल्प हजारो कोटींपर्यंत पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना हव्या त्याप्रमाणे सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, आज जागतिक महिला दिन असून अर्थसंकल्पाच्या वाचनास सुरुवात करताना अजित पवारांनी महिलांच्या कार्यास सलाम केला आहे. कोरोना काळात नर्सेसच्या रूपात महिलांनी रुग्णांची सेवा केली. राज्याच्या विकासात देखील महिलांचं फार मोठं योगदान आहे, असं सांगतानाच त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –