८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी सवांद, लॉकडाऊन जाहीर करणार का ?

उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आज रात्री ८:३० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी सवांद साधणार आहेत. महाराष्ट्रात मागील एक महिन्यापासून कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. रोजची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्राला लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे मत काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी मांडले होते. त्यामुळे आज लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्यात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. किमान १४ दिवसांचा असावं असं सगळ्याचं मत आहे. अर्थात, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तो दोन आठवड्यांचा असावा किंवा कमी असावा किंवा जास्त असावा यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील,’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊन जाहीर करणार का ? केला तर नेमका किती दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करणार? असे प्रश्न आता सर्वसामन्यांना पडलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे आज नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या –