शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर

बीड – मराठवाड्यासह राज्यातील काही दोन दिवसांत अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, फळबागा उद्ध्वस्त झाल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीने पुन्हा डोकेवर काढले असतानाच गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्या तडाख्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, फळबागांसह आंब्याला मोठा फटका बसला असल्याने बळीराजा पुन्हा एकदा कोलमडला आहे. खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली. त्यातून शेतकरी सावरत असताना रब्बी हंगामातील पिके चांगली आली. परंतु अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकावर वक्रदृष्टी केली. जोमात आलेला गहू, हरभरा, ज्वारी भुईसपाट झाले आहे. तसेच फळबागा चे ही मोठया प्रामाणात नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –