अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागणार ?

संचारबंदी

मुंबई – मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा फास आवळताना दिसतोय. देशासह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाल आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा स्तरावर यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. तरी सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या वाढत्या रुग्ण संख्याबघून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू शकतो. अशी आशंका वर्तवण्यात येत आहे.

राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. काल १ दिवसात राज्यात १० हजार पेक्षा अधिक रुग्णांचा नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागू शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या परिस्थीचा आढावा घेण्यासाठी नुकताच केंद्रातील कोरोना नियंत्रक समितीचा दौरा झाला. या दौऱ्यात महाराष्ट्राची कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती. येणाऱ्या १० मार्चला अधिवेशन संपणार आहे. अधिवेशन संपल्यावर कोरोनावर मोठा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बतम्या –