‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागणार का? जाणून घ्या महापौर काय म्हणाले…

संचारबंदी

पुणे : पुण्यात कोरोनाची स्थिती अधिकच भयावह होताना दिसत आहे. पुणे शहरात काल ( १६ मार्च ) तब्बल १९२५ नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर ७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आता पुण्यात निर्बंध अधिकच कडक करण्यात आले आहेत. लग्न समारंभात ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची आकडा वाढत आहे. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात पुर्ण लॉकडाऊन लागू करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या शहरात तपासणी आणि चाचणी वाढवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘’आम्ही शहरात सुक्ष्म विलगीकरण क्षेत्र केले आहेत. तसेच तपासणी आणि चाचण्याची प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे संपुर्ण लॉकडाऊनची सध्या गरज नाही अशी माहिती महापौर मोहोळ यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाटच आली आहे. काल ( १६ मार्च ) कोरोनाची धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात तब्बल 178664 नवे रुग्ण सापडले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी (16 मार्च, 2021) 17,864 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या 23,47,328 वर पोहोचली आहे. दिवसभरात 87 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.26 % एवढा आहे. 9510 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात एकूण 21,54,253 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.77 % एवढे झाले आहे. तर सध्या 1,38,813 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या –