राज्यात कोरोना वाढतोय लॉकडाऊन होणार का ? आज संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढते आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा वाढत्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे.

महापालिकेनं रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स तसेच इतर उपकरणं उपलब्ध करुन  दिले आहेत. तसेच महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत.

दरम्यान, कोरोना नियंत्रण आढावा बैठक, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक, संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण, नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन, पालकमंत्री अजित पवारांचे बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

तसेच अमरावती, वर्धा,भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 28,815 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –