राज्यात लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली उच्चस्तरीय बैठक

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

कोरोनाचा राज्यात उद्रेक झाल्याने राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांत याबाबत अनेक वेळा बैठका झाल्या असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आळा कसा घालणार यावर विचारविनमय करण्यात आला असून. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे या चर्चेतून समोर येत आहे.

याच प्राश्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीकडे राज्याचे डोळे लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या –