मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.
दरम्यान आजचे कोरोनाबाधीतांचे आकडे पाहून सर्वांना धडकी भरणार आहे. राज्यात आज दिवसभरात ४९ हजार ४४७ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ५५ हजार ५६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही महाराष्ट्रासाठी धिक्याची घंटा असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या –
- …..तर २ दिवसात राज्यात पूर्ण लॉकडाऊन करणार – उद्धव ठाकरे
- निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’
- आता ५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी – राजेश टोपे
- २९ मार्चपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात ३० मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन