राज्यात लॉकडाऊन होणार ? गेल्या २४ तासात तब्बल ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

कोरोना

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तर, अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती आटोक्याबाहेर गेल्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? याबाबत सामान्यांच्यामध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे. तर, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची तयारी करा, असे निर्देशच प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, आज राज्यात तब्बल राज्यात आज ४० हजार ४१४ कोरोनाबाधित  रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन १७ हजार ८७४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत एकूण एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 3 लाख 25 हजार 901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासोबतच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत असून आता 85.95% इतके झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –