‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? आज होणार निर्णय

संचारबंदी

जालना – जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात ३०८ नव्या रुग्णांची भर पडली, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या दररोजच वाढत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन आता निर्बंध आणखी कडक करण्याच्या निर्णयावर आले आहे. त्यासाठी पुन्हा लॉकडाऊन की नाइट कर्फ्यू लावायचा याचा निर्णय आज होणार आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे काही दिवसांपासून रजेवर होते. ते आजापासून रुजू होणार असून आजच प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत या बैठकीत वाढती रुग्णसंख्या, केलेल्या उपाययोजना, झालेली अंमलबजावणी, नागरिकांचा प्रतिसाद आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाययोजना किंवा निर्बंध आदींबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन लावायचा की निर्बंध अधिक कडक करायचे या संदर्भात निर्णय होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापनांना सायंकाळी सात वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली. सर्व आठवडी बाजार, सभा, कार्यक्रम, मिरवणुका, आंदोलने आदींवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून अंत्यविधी तसेच मंगल कार्यालयात लग्नासाठी फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रणाणे हॉटेल्स, उपाहारगृहे, रेस्टॉरंट, चहाचे हॉटेल, बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या काळात पार्सल सुविधेला मुभा देण्यात आली आहे.

वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय
जिल्ह्यात शनिवारी चारशे कोरोनाबाधिक रुग्ण सापडल्यानंतर रविवारीही ३०८ नव्या रुग्णांची भर पडली, तर एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, ३७० रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ३७७ पर्यंत पोहोचली आहे. यातील १६ हजार ६९९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहे. तर ४११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवे रुग्ण कुठे किती आढळले?
रविवारी दिवसभरात आढळलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जालना शहरातील २२२, तालुक्यातील हिस्वन, काकडा तांडा, बठाण, वाघ्रुळ, देवमूर्ती, बोरगाव येथे प्रत्येकी १, परतूर शहरात दोन तर तालुक्यातील सातोना येथे ३, येणोरा येथे १, घनसावंगी तालुक्यातील बहिरगड येथे १, अंबड शहरात १० तर तालुक्यातील बारसवाडा येथे २ तर करंजळा, मठपिंपळगाव, रूई, हदगाव, हस्तपोखरी, लालवाडी, साष्टपिंपळगाव येथे प्रत्येकी १, बदनापूर तालुक्यातील अन्वी, चनेगाव, बावणेपांगरी, ढासला, सोमठाणा येथे प्रत्येकी १, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे ६, तर जाफराबाद शहरासह अकोलादेव, अंबेगाव, खामखेडा, पिंपळखेडा, सावरगाव म्हस्के,वरूड येथे प्रत्येकी १, भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे ५, जवखेडा ठोंबरे येथे ४, भोकरदन शहरासह दहीगाव, नळणी येथे प्रत्येकी २ तर चिखली, धाड, पेरजापूर, पिंपळगाव, राजूर, शिरसगाव येथे प्रत्येकी १, बुलडाणा जिल्ह्यात ९, औरंगाबाद जिल्ह्यात ३ तर परभणी जिल्ह्यातील एका बाधितांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –