वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत – संजय बनसोडे

मुंबई – केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गतच्या जुन्या मंजुर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी तसेच ही कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव श्री. हजारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांच्यासह मुरुम नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, वाढीव पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीही काढण्यात आली असून ही योजना लवकरच पूर्णपणे कार्यान्वित करुन लेखाबंद करण्यावर भर देण्यात यावा. उस्मानाबाद  जिल्ह्यातील उमरगा येथील मुरुम येथील वाढीव पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाच्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपची किंमत वाढल्यामुळे तसेच इतर भाववाढीमुळे या योजनेचा खर्च वाढला आहे. तथापि योजनेमध्ये उद्भवाच्या बेनीतुरा धरणावरील अंशदानाचा समावेश होता ज्याची रक्कम सुमारे 4.50 कोटी होती. दरम्यान जलसंपदा विभागाकडून हे अंशदान रद्द करुन मुरुम नगरपरिषदेवरील बोजा कमी करण्याबाबतची सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनेवर वाढीव खर्च न होता मंजुर रक्कमेमध्येच योजना पूर्ण होईल आणि मुरुम नगरपरिषदेवर आर्थिक बोजा पडू नये तसेच अंशदान रद्द करण्याबाबत आपण स्वत: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –