चिंताजनक! मराठवाड्यात काल ६०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना

औरंगाबाद – मराठवाड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मंगळवारी एकच दिवशी मराठवाड्यात ६०५ नव्या रुग्णांची नोद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्या आढळलेल्या रुग्णांपैकी औरंगाबादमध्ये सर्वाधिक २४० रुग्णांची नोंद करण्यात आली, तर त्यापाठोपाठ जालन्यात ११७ रुग्ण आढळे आहेत, त्यानंतर परभणीत २९, हिंगोली ३८, नांदेड ७६, लातूर ४६, उस्मानाबाद १२ आणि बीडमध्ये ४७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबाद, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद या चार चार जिह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी १९७ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

औरंगाबादेत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येते आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारपासून शहरात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळेत कोणालाही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणे, थांबणे, वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जालन्यात ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद
जालन्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी वगळता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. या काळात हॉटेल व्यवसाय ५० टक्के क्षमतेने राहणार खुले राहणार आहेत, तर मंगलकार्यासाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, सार्वजणिक ठिकाणी असताना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर बंधनकारक असून कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहे. ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –