चिंताजनक! ‘या’ जिल्ह्यातील एकाच शाळेतील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कोरोना

लातूर : एकाच शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. ४० विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे माहिती होताच ३२० विद्यार्थी, १० शिक्षक, २० कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.

एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात राहायला आहेत. लातूरच्या एमआयडीसी भागात एक सीबीएसईची शाळा आहे. या शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीमध्ये कोरोनाची पहिल्यांदा लक्षणे आढळली. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. लातूरमध्ये सोमवारी एकाच दिवशी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे. सध्या तरी लातुरात लॉकडाऊनचे कुठलेही प्रयोजन नाही. मात्र, नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –