चिंताजनक! औरंगाबादमध्ये बुधवारी दिवसभरात २८१ नव्या रुग्णांची भर, सध्या १ हजार ३२१ अॅक्टिव्ह रुग्ण

कोरोना

औरंगाबाद – मराठवाड्यात बुधवारी ७०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक २८१ रुग्ण एकट्या औरंगाबादमध्ये आढळले आहेत.त्यापाठोपाठ जालना १११, लातूर ९८, नांदेड, बीड ५७, नांदेड, ५५, परभणी ५५, हिंगोली २७ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ जणांचा समावेश आहे.

मराठवाड्यात ७ जणांचा मृत्यू
उपचारादरम्यान, औरंगाबादेत तीन, नांदेड, परभणी, लातूर, बीडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुरा येथील ४७ वर्षीय पुरुष, शहरातील कलेक्टर ऑफिस कंपाऊंड परिसरातील ७४ वर्षीय पुरुष आणि देवगाव रंगारी (कन्नड) येथील ८० वर्षीय पुरुषाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबादेत १ हजार ३२१ अॅक्टिव्ह रुग्ण
औरंगाबादमध्ये बुधवारी दिवसभरात २८१ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार २९१ वर पोचली आहे. दरम्यान आणखी ७१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत ४६ हजार ७२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –