‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन उठविले, मात्र हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाणे बंदच

संचारबंदी

बीड – राज्यासह जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर लॉकडाऊनला होणारा विरोध पाहून काही शिथिलता आणल्या गेल्या होत्या. दरम्यान, रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश काढून लॉकडाऊन उठविले असले तरी हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार आहेत.

४ एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाकडे लक्ष होते. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ४ एप्रिल रोजी सायंकाळी काढलेल्या आदेशाद्वारे लॉकडाऊन उठविले जात असल्याची घोषणा केली;परंतु अटी, शर्थींसह १५ एप्रिलपर्यंत काही निर्बंध घातले आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून एक हजार रुपये तर विनामास्क फिरणाऱ्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

काय बंद, काय सुरु …

सार्वजनिक वाहतुकीसह चहाची दुकाने, टपऱ्या उघडता येणार असल्या तरी हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार आहेत. केवळ दहावी आणि बारावीच्या खाजगी क्लासेसला ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. आता सकाळी सात ते सायंकाळी आठ यावेळेत बऱ्यापैकी व्यवहार सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल बंदी मधून चहा विकणाऱ्या छोट्या टपऱ्यांना वगळण्यात आले आहे, हॉटेल बंद करण्यात आल्या असल्या तरी सकाळी सात ते सायंकाळी आठ यावेळेत पार्सल सुविधा सुरु राहील.

महत्वाच्या बातम्या –