तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बाजूला ठेऊन नवीन पीक पध्दती अमलात आणावी आणि शेतीत क्रांती घडवावी

रावसाहेब दानवे

जालना – तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बाजूला ठेऊन नवीन पीक पध्दती अमलात आणावी आणि शेतीत क्रांती घडवावी, असे आवाहान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील पॉलीहाऊस शेडनेट उत्पादीत कार्यशाळेत ते बोलत होते.

भोकरदन तालुक्यातील तपोवन गावाची नानासाहेब कृषी संजीवनी योजनेमध्ये निवड झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून तपोवन गावांमध्ये शेडनेट, पॉली हाउस, शेततळे, फळबाग लागवड अशी विविध विकासकामे झाली आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी तपोवनला भेट दिली. या वेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे, श्रीकांत इंगळे, मंडळाधिकारी श्रीकांत इंगळे, कृषी सहाय्यक सुनील रोकडे, अमोल देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी जरबेरा फुलांची लागवड आणि प्रोडक्शन, यासहा इतर गोष्टी करताना शेतकऱ्यांना काय अडचणी येतात, यासंदर्भात माहीती जाणून घेतली. तसेच, तरुण सेतकऱ्यांनी नवीन पिकपद्धती स्विकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत होईल. बॅंकांनी प्रगतशील शेतकऱ्यांना कर्ज देऊन मदत केली तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होर्इल, असे दानवे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –