दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा – जयंत पाटील

नागपूर  – कर्जमाफीच्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार होतात तसे ५ रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. दुधाची निर्यात होते की नाही हे पाहू नका. सरकारने कोतेपणा बाजुला ठेवून दुधाला ५ रुपये अनुदान दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.

राज्यात दुधाच्या दराबाबत आंदोलने सुरु झाली असून आज विधानसभेत दुधाच्या दराचा मुद्दा चांगलाच गाजला.

या राज्यातील खाजगी लोकांना सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यांना जगवण्याऐवजी शेतकऱ्यांना जगवा अशी जोरदार मागणीही आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

दुध दराबाबत आणि शेतकऱ्यांचे राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच मुद्दा आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनी आणि विरोधी सदस्यांनी उचलून धरला.

देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक