नववर्षात वर्ध्यात महिनाभरात आठ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

सरकारने कर्जमाफी जाहीर केली त्यासोबतच बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. तरी सुद्धा वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे.

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

जानेवारी महिन्यात प्रमोद नासुराम मेश्रे, अनिल प्रल्हाद गावंडे , कैलास पंडितसिंह चव्हाण , चिरकुट रामराव कोटकारे, अनिल पंजाबराव ईवनाते, मारोती ज्ञानेश्वर सोनटक्के, देवराव चंपतराव मेंढे या आठ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

पश्चिम वऱ्हाडातिला रेशीम पोहोचले कर्नाटकात

अस्मानी आणि सुल्तानी संकटांना तोंड देत बळीराजा जे काही पिकवतो, त्याला कवडीमोल भाव मिळतो. सरकारने शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना आदी विविध योजना आणल्या. मागीलवर्षी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. यात शेतकरी मेटाकुटीला आला. यातच बँकांचे कर्ज कसे फेडावे, याच विवंचनेत ते राहतात.