नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी ‘या’ काही गोष्टी नक्की करून पाहा

 सरत्या वर्षाच कडू-गोड आठवणी मागे सोडून नव्या वर्षात नवी सुरुवात करण्याचा तुम्ही संकल्प केला असेल. नवीन वर्ष उत्साहात, आनंदात आणि चांगल जावं यासाठी आम्ही तुम्हाला काही खास सोप्या टीप्स सांगणार आहोत. सुरुवातीपासून तुम्ही याचा वापर केला तर हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधानाचं जाऊ शकतं. त्यासाठी करून तुम्हाला या गोष्टी रोज नक्की करायला हव्यात.

  • रोज सकाळी मेडिटेशन किंवा ऊ कार केल्यानं आपल्या शरीरात चांगल्या लहरी निर्माण होतात. दिवसभरात तुमच्या भोवती अनेक प्रसंग घडतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. अशावेळी आपल्या विचारांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढा दिवस उत्तम जाईल.
  • जगाचा सल्ला घ्या पण कोणताही निर्णय घेताना तो स्वत: विचार करून घ्या. कारण चांगलं काय किंवा वाईट काय दोन्ही गोष्टी घडल्या तरी आपला निर्णय असतो. इतरांपेक्षा थोडं वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्याला इतर कोणीही प्रोत्साहन दिलं नाही तरीही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे कायम लक्षात ठेवा. अशावेळी आरश्यामध्ये स्वत:सोबत बोलण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे.
  •  रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा. तणाव कमी करण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. रोज किमान ३० मिनिटे सकाळी कोवळ्या वातावरणात व्यायाम करावा.व्यायामासोबत रोज सकाळी चिंतन करा. याने शरीरातील सगळा थकवा निघून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सकाळी गाणी सुद्धा ऐकू शकता. याने तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते.
  • नव्या वर्षात उत्तम आहार आणि आपला छंद नियमित ठेवण्यावर भर द्या. दिवसभरातील काही मिनिटं तुमचा छंद जोपासला तर क्षीण दूर होतो आणि एक समाधानही मिळतं. यासोबत उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची असते. त्याचं गणित चुकली मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि पर्यायाने कामावरही.

महत्वाच्या बातम्या –