सर्वसामान्यांना दिलासा तुरडाळ मिळणार निम्या दरात

टीम महाराष्ट्र देशा – सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतलाय. आणि व्यापाऱ्यांनी जादा पैसे घेऊ नये, म्हणून तूरडाळीच्या पॅकेटवर 55 रु. किलो अशी एमआरपीही छापण्यात येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
सरकार विकणार तूर डाळ
– व्यापाऱ्यांना 50 रु. किलोनं विकणार
– पॅकेटवर 55. रु. एमआरपी छापणार
– एक आणि पाच किलोची पॅकेट्स
– सरकारकडे 25 लाख क्विंटलचा साठा
– मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार