नवी मुंबईच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. 2013 पासून एपीएमसीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात कारभार देण्यात आला होता. याविरोधात कोर्टाने आदेश दिल्यानंतर नवी मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता 29 फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणा
राज्यातील शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी मिळून 18 संचालक निवडून येणार आहेत. राज्यभरातील कृर्षी उत्पन्न बाजार समितीतील 12 शेतकरी प्रतिनिधी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पाच व्यापारी आणि एका कामगार प्रतिनिधींचा समावेश आहे.विशेष म्हणजे माजी मंत्री आणि माथाडी कामगार नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांनीही कामगार गटातून संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला
या निवणुकीसाठी 75 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 14 फेब्रुवारी २०२० अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर 15 फेब्रुवारी रोजी मतदान चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.
म्हशीला रेबीज झाला म्हणून संपूर्ण गाव गेलं दवाखान्यात https://t.co/ZO7TKb5qwe
— Krushi Nama (@krushinama) January 29, 2020