राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज!

पाऊस

जालना : मराठवाड्यासह विदर्भात पुढील आठवड्यात वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेले गहू, हरभरा, शाळू ज्वारी तसेच कांदा पीक काढून घ्यावे किंवा काढलेले झाकून ठेवावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.जालना जिल्ह्यात गुरुवारपासून काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून १२ ते १३ मार्चदरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील नागपूर, वाशीम, अमरावती, बुलडाणा आणि मराठवाड्यातील परभणी, नादेंड, जालना या जिल्ह्यातील तुरळक भागात १६, १७ आणि १८ मार्च रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून पिके काढून घ्यावी किंवा पिके झाकून ठेवण्याची तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अतिशय काळजीचे पीक असलेले कांदा सीड, गहू ही पिके काढणीच्या तयारीत असल्यास ती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बतम्या –