UPI Update | PhonePe, GooglePe आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी लवकरच येणार ‘हा’ बदल

UPI Update | PhonePe, GooglePe आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी लवकरच येणार 'हा' बदल

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या गुगल पे (GooglePe), फोन पे (PhonePe) पेटीएम (Paytm) यांसारख्या युपीआय (UPI) ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या यूपीआय ॲप्समुळे पैशांचे व्यवहार करणे खूप सोपे होऊन गेले आहे. त्यामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती पैशांचे व्यवहार करण्यासाठी या ॲपचा उपयोग करत असतो. अशा परिस्थितीत यूपीआय पेमेंट ॲप्सवर लवकरच व्यवहार मर्यादा लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. कारण यूपीआय डिजिटल चालवणारी संस्था नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) सोबत या विषयावर चर्चा करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार याची अंमलबजावणी 31 डिसेंबर पासून लागू केली जाऊ शकते.

सध्या पैशाचे व्यवहार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारखे ॲप्सवर व्यवहाराची कोणतीही मर्यादा नाही. त्याचबरोबर या पेमेंट ॲप्सने 80 टक्के मार्केट काबीज केले आहे. अशा परिस्थितीमध्ये NPCI या ॲप्सवर प्रतिबंध लावण्याच्या तयारीत आहे. यासाठी NPCI अधिकारी, वित्त मंत्रालयातील अधिकारी आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.

मात्र, अद्याप याबद्दल कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून या निर्णयासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान, NPCI या महिन्याच्या अखेरीस यूपीआय मार्केट कॅप प्लॅन लागू करण्याबाबत निर्णय देऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रत्येक बँक यूपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी म्हणजेच पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी दैनंदिन मर्यादा ठरवत असते. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची यूपीआय व्यवहार मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत आहे. म्हणजे यूपीआयद्वारे तुम्ही एसबीआयचे एक लाखापर्यंत दररोज व्यवहार करू शकता. त्याचबरोबर आयसीआयसी (ICICI) बँकेची दैनंदिन मर्यादा 10,000-10,000 रुपये आहे. मात्र यामध्ये गुगल पे वापरकर्ते  25,000 पर्यंत दैनंदिन व्यवहार करू शकता.

महत्वाच्या बातम्या