व्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

व्हॅट्सअ‍ॅपने अखेर डार्क मोड फीचर सुरू केलं आहे. व्हॅट्सअ‍ॅपचं हे फीचर थिम सिलेक्शन पर्यायात दिसत आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या व्हॅट्सअ‍ॅपचा रंग पूर्ण बदलेल. अ‍ॅपचा युजर इंटरफेस डार्क ग्रीन रंगात दिसेल. चॅट करताना तुम्हाला बॅकग्राउंडमध्ये हवा असलेला कलर आणि डार्क मोड करता येईल. रात्री अंधारात डोळ्यांना जास्त प्रकाश हानीकारक असतो. अशावेळी डार्क मोड वापरणं फायद्याचं ठरतं.

जाणून घ्या गुळाचे फायदे….

सध्या व्हॅट्सअ‍ॅपने डार्क मोड फीचर बीटा युजर्ससाठी आणलं आहे. ते अॅक्टिवेट करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये बीटा व्हर्जन असणं गरजेचं आहे. डार्क मोट व्हॅट्सअ‍ॅप बीटाच्या v2.20.13 अपडेटमध्ये देण्यात आलं आहे.

खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर

तुम्ही बीटा युजर नसलात तरी ते इन्स्टॉल करता येतं. यासाठी तुम्ही WhatsApp beta v2.20.13 APK इंटरनेटवरून डाउनलोड करता येतं. मात्र ते फारसं सुरक्षित नाही. गुगल प्लेमधून तुम्ही बीटा टेस्टर प्रोग्रॅमचे हे व्हर्जन मिळवू शकता. व्हॅट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. त्याच्या टॉपला राइट कॉर्नरवर असलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. त्यानतंर सेटिंगमध्ये जाऊन चॅट हा पर्याय निवडा. त्यामधील डार्क मोड सिलेक्ट करताच तुमच्या व्हॅट्सअ‍ॅपचा रंग बदलेल.