१ मे पासून १८ वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण होणार सुरु

कोरोना

देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. सुरुवातील कोरोना योद्ध्यांना तसेच वृद्ध नागरिकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील तसेच इतर आजाराने बाधित नागरिकांना लस देण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.