एकाच दिवसात ‘या’ जिल्ह्यात तब्बल ११ हजार ६११ जणांची लसीकरण

कोरोना

औरंगाबाद – महापालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण मोहिमेत सोमवारी विक्रमी लसीकरण झाले. दोन दिवसांच्या खंडानंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्याने सोमवारी सर्वच केंद्रावर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. दिवसभरात तब्बल ११ हजार ६११ जणांची लसीकरण झाले. मागील दोन महिन्यात एका दिवसात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे.

शहरात १६ जानेवारीपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आत्तापर्यंत लसीकरणाने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचप्रमाणे दररोज सहा ते सात हजार जणांना लाभ देण्यात येत आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी लसींचा साठा संपल्याने लसीकरण थांबले होते. दोन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी सर्व ११५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यामुळे सर्वच केंद्रांवर नागरिकांनी लाभ घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे.त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मनपाने नियोजन केले आहे. सोमवारी दिवसभरात ४९७४ इतक्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचण्यात आली. त्यापाठोपाठ साठ वर्षांवरील ४०८९ तर १८४५ फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –