‘या’ जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ९०८ जणांचे झाले लसीकरण

कोरोना लस

औरंगाबाद – २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात एकूण ८०० जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील ६५२ तर शहरी भागातील १४८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण ३ लाख ८९ हजार ९०८ ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून असल्याचे जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

ग्रामीण भागात लासिकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून १८७१०५ नागरिकांचे  लसीकरण झाले. तर शहरी भागात २०२८०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २५ एप्रिल पर्यंत ग्रामीणमध्ये १७३१३३ जणांनी पहिला डोस तर १३९७२ जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण १८७१०५ जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये १७०९८५ जणांनी पहिला डोस तर ३१८७८ जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण २०२८०३ जणांचे लसीकरण झाले आहे.

तालुकानिहाय लसीकरण

औरंगाबाद – २८०६१
फुलंब्री – १२०८४
कन्नड- २८१७०
सोयगाव- ९५२१
गंगापूर- २५८८१
वैजापूर- २६५२०
सिल्लोड- २०९८९
पैठण- २६८०१
खुल्ताबाद- ८९५६

महत्वाच्या बातम्या –