valentine’s day special: ‘व्हॅलेंटाईन डे’ चिरायू होवो…!

अण्णा दंदी,अकोला 

वर्षभर लिव्हिंग रिलेशनशिप ठेवणारे करोडपती जोडपी असोत वा वन नाईट स्टॅन्ड रोमान्स करणारे कपल्स. दररोज रुपयांसाठी देह विकणारी स्त्री असो किंव्हा हातात बंदूक घेऊन जीव घेणारा अतिरेकी! प्रेम मात्र सर्वांनाच होते. फक्त परिस्थिती, वेळ, स्वप्न, ध्यय, लोभ, इर्षा, न्यूनगंड अशे अनेक प्रश्न त्याला सफल होण्यास नकार देतात.

पूर्वी प्रेमासाठी फासावर चढणारे पाहिलेत. आज ते स्वतःला समजदार ठरवून देवाची इच्छा म्हणून प्रेमात माघार घेतात. लग्न झालेल्या सफल प्रेम जोडप्यांची विशेषता पाहल्यास दिसून येते की, मुख्यतः सर्वांनी आपआपल्या क्षेत्रातील सोबती निवडलेत. डॉक्टर डॉक्टरशी, इंजिनियर इंजिनियशी…! यात अपवाद आहे हेही तेवढंच खरं. पण, प्रेम जर निवडता आलं तर ते फर्स्ट साईट इन लव्ह कोणतं…? आज कोण करतो ते मूर्खासारखं प्रेम जे फासावर चढण्यास तयार असते…? पूर्वी परिस्थिती वाईट असल्यास प्रेमाला मनातच घट्ट बांधून ठेवणारा लाचार प्रियकर पाहिला. पण आज लॉंग ड्राईव्ह जाण्यासाठी कधीही कार घेऊन उभा असणारा प्रियकर प्रत्येक सॅर्टडे नाईटला बार मध्ये ब्रेकअप पार्टी सेलिब्रेट करतो. मग हा प्रेम कधी करतो…?

romantic

दिवसभर घराच्या दरवाज्यात बसून त्याची वाट पाहणारी ती, आज दोन तीन बॉयफ्रेंड कसे मॅनेज करू शकते प्रेमात…? आज महागळं व्हॅलेंटाईन गिफ्ट घेऊन जाताना, त्या अनमोल रक्तानं लिहलेल्या पहिल्या प्रेम पत्राला हा फालतुगिरी समजतो. आणि ”बाकी काही नको फक्त तू असाच प्रेम करीत रहा” म्हणणारी ती, आज डिनरला फाईव्ह स्टार हॉटेलचीच आवर्जून चॉईस करते. मग प्रेम कधी करते…? नुकत्याच स्टेबल झालेल्या प्रियकराच्या प्रेम प्रस्तावाला नाकारणारी ती, आज मला सेटल मुलगा हवाय म्हणून शादी डॉट कॉमवर मुलं सर्च का करते. एकीकडे छत्तीस पैकी सतरा गुण मिळाले तरी चालतात. आणि दुसरीकडे आपण आचार-विचार, आवडी-निवडी, रंग-रूप, अगदी व्यवसाय देखील जुळून यावेत ह्या अपेक्षा ठेवतो.

prem 3

आयुष्यभर आंधळ्या नवऱ्याचा हात हातात घेऊन भीक मागणारी धळधाकट स्त्री काय अपेक्षा बाळगत असेल त्याच्याकडून.? मग आयुष्याच्या सोबतीसाठी आपण थोडा फरक कॉम्प्रोमाईज का नाही करु शकत ? प्रेमाचा पहिला अनुभव ज्याचा प्रत्येक शब्द मोजून मापून असते. पहिला स्पर्श जो शरीरावर शहारे आणतो. पहिली तिची लाजिरवाणी स्माईल हा कुठे जपून ठेवतो…? उद्या आपल्याकडे कदाचित सर्वच असेल पण जिवलग प्रियकर अथवा प्रियसी नसेल. आज त्यांना मिळवण्याचा हा सुवर्ण क्षण फक्त एका गुलाबाच्या फुलात आणि कॅडबेरी चॉकलेट मध्ये बांधून ठेवू नका. वेळ आल्यास स्वतःला बदला! उद्या ते तुमच्यासाठी बद्दलतीलच! कारण फिंगर प्रिंट सर्वांचे सारखे नसतात. आपली स्वप्न, आपली आवड, आपलं ध्येय, सर्व काही आपलंच. दुसऱ्याचा विचार न करता स्वतःला चौकटीत बांधून ठेवणं म्हणजे स्वतंत्र असेल तर, त्या चौकटीचा पिंजरा होण्यास वेळ लागणार नाही. आज ज्या चुकांमुळे आपण त्यांचं नातं तोडायला तयार आहोत, त्यांना सोडायला तयार आहोत. उद्या त्या चुका आपण विसरून जाऊ. पण त्या लोकांना विसरता येणार नाही. तेव्हा चुकांना विसरणं किव्हा बदलणं महत्वाचं कि प्रेमाला…? प्रेम हे प्रत्येकाला हवंय. प्रेमाला खरंच उपमा देता येणार नाही. प्रेम ब्लड कॅन्सर सारखी प्रत्येकाच्या रक्तात भिनलेली भावना आहे. तिला मिटवता येत नाही, सोडून जाता येत नाही. म्हणून त्याला मिळवण्यात कुठल्याच प्रयत्नात कमी ठेवू नका. एकदा गेलेली वेळ परत येणार नाही. उद्या पच्छताप केल्या पेक्षा आज हिम्मत करा. शेवटी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, त्यानं दिलेलं प्रेम सर्वांना मिळू दे…!

love 2