विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ने सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजास वंदे मातरम्‍ने सुरुवात करण्यात आली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह मंत्री, राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश धानोरकर, प्रतापराव चिखलीकर, हर्षवर्धन जाधव, अनिल गोटे, जयदत्त क्षीरसागर, गिरीश बापट, राधाकृष्ण विखे-पाटील, उन्मेश पाटील, हेमंत पाटील आणि इम्तियाज जलील यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले.