अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे

अळशी

अळशी (lazy) आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशी खाण्याचे  शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

  • अळशीमध्ये प्रोटीन असल्याने ते महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे.
  • अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
  • दररोज अळशी खाल्ल्याने संधीवात, सांधेदुखीमध्येही आराम पडतो. हाडं मजबूत होण्यास मदत होते.
  • अळशीमध्ये लिगनेन असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज थोडी अळशी खाल्याने मधुमेह होण्याचा धोका अतिशय कमी होतो.
  • अळशीमध्ये ओमेगा-३ असतं जे, बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतं.
  • अळशीमुळे पचनशक्ती चांगली, सुरळित राहते. शरीराला उर्जा मिळते. अळशीमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती सुधारतं.

महत्वाच्या बातम्या –