विदर्भात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ढग दिसताच कृत्रिम पाऊस पाडला जाणार

कृत्रिम पाऊस

गेल्यावर्षीपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. यंदा तर पावसाने दडी मारल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ११ इंचापर्यंत खाली मुरला आहे. यानंतरही जलप्रकल्प तळाला गेले आहे. विदर्भाकडेही मान्सूनने पाठ फिरविली आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या. जलाशयातील पाणी पातळीही खाली गेली आहे. विदर्भात कुठेच मान्सूनचा जोर नाही.

मान्सून सक्रिय नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची कबुली हवामन विभागाच्या संचालकांनी दिली आहे.

पावसाने दडी मारल्याने विदर्भात पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्या दृष्टीने कृत्रिम पावसासाठी डाफलर रडार नागपूर विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून ४०० किलोमीटर परिघात पाण्याच्या उपलब्धतेचा ढग दिसताच कॅल्शीयम क्लोराईडची फवारणी करून पाऊस पाडला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘पाणी पुरवठ्यात अडचण येत असेल तर मला सांगा, आज सरकार मीच आहे’

कर्नाटकातील जनता दल सेक्युलर काँग्रेसचे आघाडी सरकारचा आज फैसला
Loading…