विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत

वेबटीम : राज्यात सध्या पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. तरी संपूर्ण राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांतल्या त्यात विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतीतील पिके सुकू लागली आहे तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे . तर काही शेतीतील पिके आता नांगी टाकत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दांडी दिल्याने लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
गेल्या काही वर्षापासून असलेली सततची नापिकी, खते आणि बियाणे ह्यांच्या वाढलेल्या किंमती, बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा डोगर, आकाशला भिडलेली महागाई ह्यामुळे शेतकरी पुरता भरडला गेला आहे. त्यातच अनियमित पडणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात सापडली आहे.जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गाने चांगल्या प्रकारे पेरणी केली होती पण त्यानंतर नुसता पावसाचा शिडकावा येतो पण ज्या पद्धतीने पिकांना पाणी पाहिजे त्या पद्धतीने अजून सुद्धा पाऊस पडलेला दिसत नाही आहे. सध्या काही ठिकाणी हि पिके तग धरून आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. ते पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुढील सात आठ दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.