मोहिते-पाटलांना दणका; विजय शुगर कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडेच!

सोलापूर-  विजय शुगर कारखान्याच्या बाबतीत सुरु असलेल्या वादात कारखान्याची मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच सुपूर्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मुळे मोहिते-पाटलांना मोठा धक्का बसला आहे .कर्ज वसुलीसाठी बँकेने अनेक वेळा नोटिसा बजावून देखील कारखान्याच्या संचालकांनी गांभीर्याने न घेतल्याने कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण असल्याने ‘सिक्युरिटायझेशन अॅक्ट’खाली त्याचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला होता. त्यानंतर ‘सरफेसी’ कायद्यानुसार प्रत्यक्ष ताबा द्यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. त्यावर सुनावणी झाली. तब्बल अडीच वर्षांनी बँकेच्या बाजूने निकाल मिळाला.

काय आहे प्रकरण ?
अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या ताब्यातील शिवरत्न उद्योग समूहाचा हा कारखाना आहे. त्याने जिल्हा बँकेकडून ११३ काेटी रुपयांचे कर्ज घेतले. २०१२ मध्ये त्याची उभारणी झाली. अवघे दोन गळीत हंगाम करून कारखाना बंद पडला . दरम्यान जिल्हा बँकेने दिलेले कर्ज ११३ कोटींवरून व्याजासह १८३ कोटींपर्यंत पोहोचले. कर्ज वसुलीसाठी बँकेने अनेक वेळा नोटिसा बजावून देखील कारखान्याच्या संचालकांनी गांभीर्याने न घेतल्याने कारखान्याची मालमत्ता बँकेकडे तारण असल्याने ‘सिक्युरिटायझेशन अॅक्ट’खाली त्याचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला होता त्यानंतर ‘सरफेसी’ कायद्यानुसार प्रत्यक्ष ताबा द्यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. त्यावर सुनावणी झाली. तब्बल अडीच वर्षांनी बँकेच्या बाजूने निकाल मिळाला.