शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली…ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र शिवसेनेनं बांधावे असा खोचक सल्ला विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील ज्वलंत समस्या आणि सरकारविरोधातील रणनितीवर चर्चा करण्यात आली. उद्यापासून नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांनी पत्रकार परिषद घेवून सरकारवर हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेतील का प्रमुख मुद्दे –

  • राज्य सरकारने अफवा पसरवणे बंद करावे, नुसत्या घोषणा काम काही नाही? धुळे घटनेतील पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये द्यावे.-राधाकृष्ण विखे पाटील
  • राज्यात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत -विखे पाटील
  • सरकार केवळ अफवा पसरवत आहे. चांदयापासून बांदयापर्यंत जनतेमध्ये नाराजी : राधाकृष्ण विखे पाटील
  • मुंबईचा डीपी प्लॅन जनतेसाठी डिझास्टर प्लॅन : राधाकृष्ण विखे पाटील
  • पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूर घेण्यामागचे कारण काय ? : धनंजय मुंडे
  • शेतकऱ्यांचे जीवनमान या सरकारने उध्वस्त केले. : धनंजय मुंडे

मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही?; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर

विकास प्रकल्प पूर्ण करतानाच भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी