पेयजल योजनेसाठी गावकरी कंत्राटदारा विरोधात एकवटले

पेयजल योजनेसाठी गावकरी कंत्राटदारा विरोधात एकवटले water tap scaled e1580891337195

धनेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ३५ लाख रूपयांचा नळ योजनेच्या कामात अनियमीतता होत असल्याच्या अरोप गावकरी करत आहे . या संदर्भात गावकरी कंत्राटदारा विरोधात एकवटले आहे. गावात कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली असली तरी अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम केले नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी एकत्र आले आहेत. गावात नळयोजने अंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोरवेलमधील पाणी हे पिण्यासाठी शुद्ध नसल्याने पाणी फिल्टर करणे गरजेचे आहे.

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

अर्धवट कामे करून कंत्राटदार सदर योजनेतून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसभेत एकमताने सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून पुन्हा एकदा नवीन कंत्राटदाराकडून नळ योजनेचे काम करण्यासाठी गावकरी ठाम आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत नसून गावकऱ्यांशी मुजोरी करीत असल्याने गावकरी कंत्राटदाराविरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव घेणार आहेत.