व्हिडीओ:सासऱ्याच्या कारखान्याला अडचण नको म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी शेवगावमधील आंदोलन चिरडले–भाकप

शेवगाव : शेवगाव मध्ये उस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाला आणि पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेचा सगळ्याच थरातून निषेध होत असताना हे आंदोलन चिरडण्यामागे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

या आंदोलनामुळे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्या खासगी साखर कारखान्याला बाधा पोहचत असल्याने नांगरे पाटलांनी पोलिस यंत्रणेत हस्तक्षेप केला आणि हे आंदोलन चिरडल त्यामुळे त्यांना त्वरित अटक करा अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांनी केला आहे.

शेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर परिसरात असणारा गंगामाई हा खासगी साखर कारखाना विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आणि उद्योजक पद्माकर मुळे यांचा आहे. या कारखान्याने इतर कारखान्यांप्रमाणे २५०० रुपये दर मान्य केला असता, तर आंदोलन चिघळले नसते, असा आरोप भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांनी केला आहे.

नांगरे पाटील काही वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक होते. इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी इतर जिल्ह्यातसुद्धा सहज हस्तक्षेप करू शकतो. गंगामाई कारखान्याविरोधात मापात घोळ केल्याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. कारखान्याने शेवगाव पोलिस स्टेशनला काही बांधकामे करून दिल्याचा आरोप त्यांनी केला.

पहा काय म्हणाले सुभाष लांडे