शरद पवार घेणार नरेंद्र मोदींची ‘या’ प्रश्नावर भेट

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साखरेच्या प्रश्नावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन साखर उत्पादकांच्या विविध समस्या त्यांच्या समोर मांडणार आहेत.सध्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांपासून सर्वच जण अडचणीत आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर पत्रकार परिषदेत बोलत होते.

साखर उत्पादनासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही पाठवले होते. यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्राने मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली. ६० टक्के साखरेवर सेस लावून रक्कम उत्पादकांनी द्यावी तसेच पेट्रोलप्रमाणे इथेनॉलचे दरही वाढले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.