वोडाफोनचा नवीन धमाकेदार 269 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढतेय. याच स्पर्धेत आता Vodafone ने 269 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. एका महिन्यापेक्षा अधिक वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये डेटा, फ्री कॉलिंगसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतील. 269 रुपयांच्या प्लॅनमध्ये 600 फ्री एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.  56 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये एकूण 4जीबी डेटाही मिळेल.

जिओच्या ग्राहकांसाठी ‘2020 हॅप्पी न्यू इयर ऑफर’

व्होडाफोनचा हा प्लॅन ५६ दिवसांची वैधता असलेल्या इतर कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा बराच स्वस्त आहे. येत्या काही दिवसांमध्ये व्होडोफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलकडून अशाप्रकारचा प्लॅन आणला जाण्याची शक्यता आहे. तर जिओच्या 329 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस वैधता असून जिओने हा प्लॅन व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या 379 रुपयांच्या प्लॅनला उत्तर म्हणून सादर केला होता.